नमस्कार मित्रांनो !
मराठी साहित्याने मला लहानपणापासून भुरळ घातली आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत गोट्या आणि चिंगीपासून ययाती आणि मृत्युंजयपर्यंत अनेक पुस्तके आहेत. जे काही वाचलं ते मनामध्ये रुजून बसलं. आणि त्यातूनच मग लिखाणाची आवड निर्माण झाली.
माझ्या लिखाणाचा उद्देश हा मुख्यतः लोकांना थोडासा विरंगुळा मिळावा, मराठी साहित्याबद्दल थोडीशी आस्था निर्माण व्हावी, कवितांचा आनंद घेता यावा, चांगल्या पुस्तकांची माहिती मिळावी आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा आहे.
माझं लिखाण तुम्हाला आवडत असेल तर मला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा.
त्याचबरोबर माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज लाईक आणि युट्युब चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
त्याचबरोबर जर तुम्हाला एखादी कविता लिहून हवी असेल, किंवा आपल्या प्रिय व्यक्तींसाठी संदेश लिहून हवा असेल, अथवा फेसबुक पोस्ट लिहून हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर संदेश पाठवू शकता.
आपली नम्र ,
मधुराणी
You must be logged in to post a comment.