The Cookie Thief

A woman was waiting at an airport one night,

with several long hours before her flight.

She hunted for a book in the airport shops,

bought a bag of cookies and found a place to drop.

एक बाई विमानतळावर काही तास आधी पोचली. तिला वेळ घालवायचा होता म्हणून तिने एक पुस्तक विकत घेतले आणि एक बिस्किटाचा/कुकीजचा पूड विकत घेतला. आणि एका जागी जाऊन बसली

She was engrossed in her book

but happened to see,

that the man sitting beside her, as bold as could be. . .

grabbed a cookie or two from the bag in between,

which she tried to ignore to avoid a scene.

ती तिच्या पुस्तक वाचनात व्यग्र होती आणि तरीही तिच्या शेजारी बसलेल्या माणसाकडे तिचं लक्ष गेलं. त्या माणसाची हिम्मत बघा, त्याने चक्क त्या दोघांच्यामध्ये ठेवलेल्या कूकीजच्या पाकिटातून काही कुकीज काढून घेतल्या आणि खाल्ल्या. तिला धक्काच बसला. पण उगीच वाद नको म्हणून तिने दुर्लक्ष केलं

So she munched the cookies and watched the clock,

as the gutsy cookie thief diminished her stock.

She was getting more irritated as the minutes ticked by,

thinking, “If I wasn’t so nice, I would blacken his eye.”

घड्याळाकडे बघता बघता ती कुकीज खात राहिली आणि तिच्या शेजारचा आगाऊपणाने तिच्या कुकीजवर ताव मारत राहिला. मी जर एवढे चांगली नसते तर बघूनच घेतलं असत याला, असा विचार त्या बाईच्या मनात डोकावला

With each cookie she took, he took one too,

when only one was left, she wondered what he would do.

With a smile on his face, and a nervous laugh,

he took the last cookie and broke it in half.

तिने एका बिस्कीट घेतलं कि तो एका घ्यायचा. सरतेशेवटी जेव्हा एकच बिस्कीट उरल, तेव्हा आता हा धटिंगण काय करणार बरं असा प्रश्न तिला पडला. त्याने चेहऱ्यावर ओशाळवाणं हसू आणून शेवटचं बिस्कीट उचललं,

He offered her half, as he ate the other,

she snatched it from him and thought… oooh, brother.

This guy has some nerve and he’s also rude,

why he didn’t even show any gratitude!

त्याने चक्क ते बिस्कीट अर्ध्यात तोडलं, अर्ध तिला दिलं आणि अर्ध स्वतः खाल्लं. तिने रागावून जवळपास ते बिस्कीट त्याच्या हातातून हिसकावूनच घेतलं. कसला माणूस आहे हा. साधं थँक्स सुद्धा म्हणाला नाही.

She had never known when she had been so galled,

and sighed with relief when her flight was called.

She gathered her belongings and headed to the gate,

refusing to look back at the thieving ingrate.

तिला इतका राग या आधी कधी आला नव्हता. जेव्हा तिची फ्लाईट अनाऊन्स झाली तेव्हा तिने सुटकेचा निश्वास टाकला, आणि आपली बॅग घेऊन ती तरातरा चालत निघून गेली. तिने त्या बिस्कीट चोराकडे मागे वळूनही पाहिलं नाही.

She boarded the plane, and sank in her seat,

then she sought her book, which was almost complete.

As she reached in her baggage, she gasped with surprise,

there was her bag of cookies, in front of her eyes.

ती प्लेनमध्ये चढली, आणि आपल्या जागेवर जाऊन बसली. तिने जवळपास पूर्ण होत आलेलं पुस्तक बॅगमधून काढायला बॅगेत हात घातला आणि काय आश्चर्य ! तिचा कुकीजचा पूड तिच्या बॅगेतच होता.

If mine are here, she moaned in despair,

the others were his, and he tried to share.

Too late to apologize, she realized with grief,

that she was the rude one, the ingrate, the thief.

जर माझी कुकीजची बॅग इथे आहे, तर ती बॅग त्याची होती.आणि त्या बिचाऱ्याने माझ्यासोबत त्याचे कुकीज share केले होते. आता माफी मागणंसुद्धा शक्य नव्हतं. तिला खूप उशिरा कळलं , खरंतर तीच कृतघ्न बिस्कीटचोर होती.