इंग्रजी भाषा प्रभावीपणे बोलण्यासाठी काय करावे?

कोणतीही GENERAL माहिती मी देणार नाही. मी माझं इंग्लिश सुधारण्यासाठी जे केलं तेच सांगेन.

खालील काही महत्त्वाच्या स्टेप्स वापरून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकता.

१. इंग्रजी व्याकरण सुधारण्यासाठी Buy Navneet Speakwell English – Marathi Avrutti Book Online at Low Prices in India हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. या पुस्तकातील पहिले ३० धडे आत्मसात करा. त्यांनी प्रत्येक धड्यामागे काही वाक्ये भाषांतरासाठी दिली आहेत. त्यांची उत्तरे पुस्तकाच्या शेवटी दिली आहेत.

कालानुरूप वाक्य रचना करण्यासाठी हे धडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

२. इंग्लिशमध्ये बहुतेक VERB ला शेवटी ED लावून त्याचे PAST TENSE मध्ये रूपांतर करता येते. पण काही VERBS IRREGULAR आहेत. ते पाठच करावे लागतात. Irregular Verbs | ENGLISH PAGE हि लिस्ट रोज वाचत जा. काही दिवसांनी ती आत्मसात होऊन जाईल.

३. VOCABULARY (शब्दसंग्रह): https://catmentor.files.wordpress.com/2015/01/norman-lewis-word-power-made-easy-fully-revised-expanded-new-paperback-edition.pdf हे पुस्तक VOCABULARY वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दिवसाला किमान ५ शब्द पाठ करा. शब्द लिहून घ्या आणि सहज तुम्हाला दिसेल अशा जागी लावून ठेवा. दिवसभर त्याच्याकडे नजर जात राहील आणि शब्द पाठ होऊन जाईल.

४. कोणतीही एक इंग्लिश SERIES बघायला सुरवात करा : मी फ्रेंड्स SERIES सुचवेन, ती SERIES अत्यंत विनोदी आहे. तुम्हाला बघताना कंटाळा येणार नाही. शिवाय शब्दसंपत्ती वाढेल. आपण पुस्तकी भाषा दैनंदिन जीवनात वापरत नाही. “मी जेवत आहे ” असं सहसा कोणी म्हणत नाही. “मी जेवतोय” असंच सहसा म्हटलं जात. म्हणून भाषेचा लहेजा आत्मसात करण्यासाठी ती भाषा वारंवार कानावरून जाण हे अनिवार्य आहे. इंग्लंड मध्ये लहान मूलसुद्धा इंग्रजीत बोलत. ते काय व्याकरणाची पुस्तक वाचून? ऐकून ऐकूनच ना? म्हणून भाषा कानावर पडणे अत्यंत आवश्यक आहे. SERIES एकदा नाही तर अनेकदा बघा. जोपर्यंत त्यातली वाक्य पाठ होत नाहीत तोवर बघा. वाक्य तोंडात बसायला हवीत. पुढचं एक वर्ष फक्त इंग्लिश SERIES बघा. SUBTITLES वर भर द्या.

५. वाक्य तोंडात बसण्यासाठी तुम्ही अजून एक करू शकता. छोटे छोटे TOPICS (MYSELF, MY MOTHER, MY FAVORITE BOOK, MY SCHOOL ETC ) घेऊन त्यावर काही ओळी लिहा आणि पाठ करून टाका. जेणेकरून वाक्य तोंडात बसतील. सुरवातीला शब्दच सुचणार नाहीत. DICTIONARY मध्ये असे शब्द शोधा. तुम्ही स्वतः शोधलेले शब्द तुम्ही सहसा विसरणार नाही. एखाद छोटेखानी पुस्तक घेऊन वाचायला सुरवात करा. प्रत्येक ना कळलेल्या शब्दाचा अर्थ शोधायताची गरज नाही. फक्त एखादा शब्द वारंवार येऊन सुद्धा तुम्हाला कळत नसेल तर त्याचा अर्थ बघा. आणि अर्थ समासात लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही ते पुस्तक दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वाचाल तेव्हा हे समासातले शब्द तुम्हाला कायमचे लक्षात राहतील.

६. जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकायला सुरु करता तेव्हा काही अवस्थांमधून तुमचं संक्रमण होताना तुम्हाला जाणवेल.

भाषांतर अवस्था :सुरवातीला जेव्हा तुमच्याशी कोणी इंग्रजीत संवाद साधायचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्ही कचराल. डोक्यात वाक्यरचना कराल आणि धीर एकवटून एखाद वाक्य बोललं. तुम्हाला अचानक वाक्य सुचेल पण एखाद्या बरोबर शब्दासाठी अडाल. अशावेळी घरी जाऊन चाऊसची मराठी TO इंग्लिश DICTIONARY खूप कामाला येईल. Amazon.in: Buy Chaus Dictionary Book Online at Low Prices in India मनात त्या संवादावर नंतर विचार करा. कि ते वाक्य अजून चांगलं कसं झालं असत. पूर्ण संभाषण तुमच्या डोक्यात घोळवा आणि त्याला इंग्रजी रूपांतर करण्याचा प्रयत्न करा.

नंतर तुमच्या डोक्यात इंग्रजीतून विचार करायला सुरवात करा. जेव्हा तुम्ही एखाद इंग्रजी पुस्तक वाचाल किंवा SERIES बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि त्यानंतर काही वेळ तुम्ही स्वतःशी इंग्रजीतून बोलताय. तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल.

नंतर कधीतरी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात अजाणता एखादे वेळेस इंग्लिश मधून बोलून जाल. तुम्हाला शाबासकी मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल. या नंतर तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तुम्ही स्वतःच अत्यंत कमी वेळात खूप प्रगती गाठून जाल.

व्याकरण आणि थोडेफार शब्द यांच्या मदतीने तुम्ही कामचलाऊ इंग्रजी नक्कीच शिकू शकाल. पण भाषा आत्मसात होण्यासाठी वेळ लागेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.