कर्जदार

हर एक आठवणीचा
आनंद फार आहे;
साऱ्याच जीवनाचा
मी कर्जदार आहे !

दुःख होते खरे पण
विस्मृतीचे वरदानही आहे
स्मृतीत आनंद ठेव्यांची
मोजदाद फार आहे
साऱ्याच जीवनाचा
मी कर्जदार आहे !

प्रत्येक क्षणी सुख
शोधण्याचा सोस फार आहे
कष्टांना फुले मानण्याची
जिद्द बेसुमार आहे
साऱ्याच जीवनाचा
मी कर्जदार आहे !

-मधुराणी