स्वीकार स्वतःचा

स्वतःला नाकारण्यापासून स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो. खरतर तो सर्वात सोपा असायला हवा. स्वतःपासून स्वतःपर्यंतच अंतर एवढं मोठं कधी झालं? आपण अशा समाजात राहतो जिथे सतत आपल्याला दुसऱ्यांना काहीतरी सिद्ध करायचं असते. चारीबाजूने निगेटिव्ह विचारांचा मारा होत असतो. तुमच्यात काहीतरी कमी आहे हे सतत जाणवून दिल जात. आपल्याला वाटत कि प्रेम हे बक्षीस आहे. तुम्ही चांगलं दिसत असाल तर तुम्हाला ते बक्षीस मिळेल. तुम्ही यशस्वी असाल तरच तुम्हाला ते बक्षिस मिळेल. पण असं नाही आहे. प्रत्येकजण प्रेम डिझर्व करतो. आणि त्याची सुरवात स्वतःवरच्या प्रेमातून होते. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, ती व्यक्ती दुसऱ्यावर कस प्रेम करू शकेल? जी व्यक्ती स्वतः खुश नाही ती दुसऱ्या कोणाला कशी खुश ठेवू शकेल? ज्या व्यक्तीच स्वतःवर प्रेम नाही त्या व्यक्तीवर दुसऱ्या कोणी का प्रेम करावं?ज्या व्यक्तीला स्वतःचे इम्पर्फेकशन्स खुपतात त्या इम्पर्फेकशन्सला जगाने का स्वीकारावं?

म्हणून स्वतःवरच प्रेम हे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या कोणी तुमच्यावर प्रेम करण्याआधी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे अन दुसऱ्या कोणी तुम्हाला हवं तसं स्वीकारण्याआधी तुम्ही स्वतःला स्वीकारलं पाहिजे.

आता हे स्वीकारायचं कसं?

स्वतःचा स्वीकार : आपल्याला स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे. आनंदाने.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? माझं नाक सरळ नाही, माझं वजन जास्त आहे, मला हवं ते मी अजून मिळवलं नाही, माझा जॉब चांगला नाही. मी स्वतःला कस स्वीकारू शकतो? असं म्हणतात if you love the life and body you have, you will have the life and body you love.

सर्वात प्रथम स्वतःच्या स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा. मग तो तुमचा मनमोकळा स्वभाव असेल, तुमची निरीक्षणशक्ती असेल, तुमची लेखनकला असेल, तुमचं गायन असेल, खेळातील प्राविण्य असेल, या सर्वांची यादी करा. जेव्हाही तुम्हाला स्वतःबद्दल निराश वाटेल तेव्हा ही यादी वाचा. तुमचं तुम्हालाच कळेल कि जगाला देण्यासाठी तुमच्याकडे किती गोष्टी आहेत.

आरशात बघून स्वतःला “I love you” सांगणे.

हा डायलॉग खूप फेमस आहे. स्वतःबद्दल आरशा समोर उभं राहून पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या तर नकळत आपण त्याच्यावर विश्वास ठेवू लागतो. मग जाणवायला लागत, कि अरे, माझी स्माईल किती गोड आहे. किंवा माझे केस खूप छान आहेत. आपलं नकळत स्वतःच्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष जाऊ लागत.

“मी खूप सुंदर आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. मी खूप आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.”अशाप्रकारच्या स्वआज्ञा तुम्ही द्यायला हव्यात. आधी तुमचा विश्वास नसेल तरीही या गोष्टी स्वतःला सांगत राहा. आणि हळूहळू तुम्हाला कळेल कि तुम्ही तसेच बनत चालला आहेत. नव्हे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीही या गोष्टी नोटीस करु लागतील.

कृतज्ञता : हा खूपच अंडररेटेड गुण आहे. आज तुमच्याकडे जे आहे त्याला तुम्ही खूप ग्रांटेड घेता. चांगले आईबाबा, सुधृड शरीर, चांगलं घर या गोष्टी सर्वांकडे नसतात. आज तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कदाचित कोणीतरी तडपत असेल. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरच्या पिंपल्समुळे स्वतःचा राग येत असेल, पण कदाचित कोणीतरी जगात दुसरीकडे स्किनकॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगाचा सामना करत असेल. तुम्हाला आज जॉब मिळाला नाही म्हणून स्वतःचा राग आला असेल, तर दुसरीकडे कुठेतरी दिवसाचा रोजगार न मिळाल्यामुळे कोणाच्यातरी घरात लोक उपाशी झोपले असतील. म्हणून कधीच कधीच कधीच स्वतःला मिळालेल्या गोष्टींना ग्रांटेड घेऊ नका. आपल्याला हे सर्व देण्याबद्दल युनिव्हर्सचे आभार माना. याप्रकारे तुम्ही स्वतःची सध्याची लाईफ स्वीकारू शकता.

ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकता ती व्यक्ती तुम्हीच बनून जा : तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्यक्तीवर प्रेम करायला आवडेल? हुशार, यशस्वी, आनंदी, मनमिळावू, नम्र, देखणी व्यक्ती? कि धूर्त, कावेबाज, भांडकुदळ, अडेलतट्टू आणि अहंकारी? मी अंदाजानं सांगते कि तुम्हाला आधीची व्यक्ती व्हायला आवडेल. हुशारी येते ती वाचनाने, प्रवासाने, हुशार लोकांसोबत वेळ घालण्याने, इन्फॉर्मशन देणारे विडिओ बघितल्याने. यश मिळत ते मेहनत करून. आणि मनमिळावूपणा येतो तो समोरच्या व्यक्तींना आहे तसं स्वीकारल्यामुळे. देखणेपणा आजकाल चेहऱ्यावर नाही तर फिटनेसवर मोजतात त्यामुळे व्यायामाने तो कमावता येतो. आनंदीपणा येतो तो मी कोणत्याही परिस्थितीत आनंदीच राहणार या निग्रहातून. आनंद ही मनाची अवस्था आहे. आयुष्य हा प्रवास आहे. एक गोष्ट मिळवल्यानंतर होणार आनंद काही काळ टिकणारा आहे. खरी मजा त्या गोष्टीला मिळवण्याच्या प्रवासात आहे हि गोष्ट कि तुम्ही आनंदी राहू शकाल. तुम्हाला एक चांगली व्यक्ती व्हायचं आहे कारण तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला कारण द्यायचं आहे. तुम्ही चांगले आहेत यावरचा विश्वास आणि तुम्हाला अजून चांगलं बनायचं आहे यासाठीचा प्रयत्न तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवेल. तुम्हाला चांगलं व्हायचेच आहे ते तुमच्यासाठी. जगासाठी नाही. तुम्ही स्वतःवर अजून प्रेम करावं यासाठी.

माफ करणं : समजा तुमच्या आवडत्या व्यक्तीने काही चूक केली, आणि त्या व्यक्तीला त्या चुकीची जाणीव झाली, तर तुम्ही त्या व्यक्तीला माफ कराल कि नाही? समजा ती व्यक्ती कधी अपयशी झाली तर तिला जवळ घेऊन धीर द्याल कि नाही? प्रोत्साहित कराल कि नाही ? मग स्वतःसोबत तुम्ही अन्याय का करता? तुमच्याकडून चूक होऊ शकते. माणूस हा अपूर्ण आहे. भल्याभल्या लोकांच्या हातून चुका झाल्या आहेत. मग तुम्ही चुकलात तर बिघडलं कुठे? आणि लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची अजिबात गरज नाही. एकतर बोलणारे तुमच्या माघारी बोलतात, आणि समजा कोणी येऊन जर विचारलाच, “का रे बाबा, का अपयशी झालास?” तर सरळ सांगा, “हो झालो फेल, मग?” उद्या तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच लोक तारीफ करतील. म्हणून स्वतःची मनशांती ढळू देऊ नका. स्वतःला शिक्षा करू नका. स्वतःच्या कमतरतांसाठी स्वतःला माफ करा. स्वतःला प्रोत्साहन द्या आणि धीर द्या.

निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा: जे लोक तुम्हाला वाईट वागवतात त्यांच्यापासून लांब राहा. जे लोक तुमची थट्टा करून तुमच्या आत्त्मविश्वासाचं खच्चीकरण करतात अशा लोकांपासून लांब राहा. ते लोक तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्यापासून थांबवतात.

स्वतःच्या मनाचा आवाज ऐका: तुम्हाला जर कोणी मदत मागितली आणि तुम्हाला ती करावीशी वाटली तरच करा. जर तुम्हाला मदत करण शक्य नसेल किंवा करायची नसेल तर नका करू. आणि ती व्यक्ती तुमचे आभार मानेल, तुमचे उपकार स्मरणात ठेवेल म्हणून तर अजिबातच नका करू. ती मदत करून तुम्हाला स्वतःविषयी चांगलं वाटणार असेल तरच करा. आजूबाजूचे लोक तुम्हाला वेगवेगळे सल्ले न मागता देत असतात. आणि तुम्हाला ते पटले तरच ऐका. आपल्या आतल्या आवाजाला दाबू नका. नाहीतर तुम्ही स्वतःला कोसत राहणार आणि स्वतःवर प्रेम करू शकणार नाही.

लोकांच्या कॉम्प्लिमेंट्स स्वीकारायला शिका: तुम्ही आज खूप छान दिसत आहात हे जेव्हा तुम्हाला कोणी सांगत तेव्हा जनरली तुमची प्रतिक्रिया काय असते? “खरंच? धन्यवाद.” कि “काहीपण नको बोलूस, मी काही खास दिसत नाही.” अशी असते? लोक जेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात तेव्हा काही लोक ती स्वीकारतात आणि धन्यवाद देतात. काही लोक त्यावर अविश्वास दाखवतात आणि काही लोक नुसते अविश्वास दाखवून थांबत नाहीत तर स्वतःमधले दोष दाखवून मोकळे होतात. शेवटचा प्रकार अतिशय अयोग्य आहे. तुम्ही असं पॉईंट आऊट केल्या नांतर समोरच्या व्यक्तीच लक्षही त्याकडे वेधलं जात आणि तुमच्या बद्दलच कौतुक नष्ट होत. त्याच्या डोळ्यातही आणि तुमच्या डोळ्यातही. म्हणून जर कोणी कौतुक केलं तर त्याचा आदरपूर्वक स्वीकार करा.

मेडिटेशन : मेडिटेशनमुळे तुमच्या आतबाहेर शांती प्रस्थापित होईल. मनावरचा ताबा वाढेल. पॉझिटिव्ह अफर्मेशनचे मेडिटेशन स्वतःवर प्रेम करायला खूप मदत करतात.

स्वतःचा दर्जा राखा: नेहमी स्वतःला उच्चं दर्जाची व्यक्ती माना. यामुळे तुमच्या हातून गॉसिप आणि लावा लावी सारख्या गोष्टी होणार नाहीत. क्षुद्र गोष्टीत (कोण मला काय बोललं,कोण माझ्यासोबत कस वागलं इत्यादी) मन अडकणार नाही. स्वतःचा शब्द पाळा. दिलेली वेळ पाळा. नेहमी योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.मला काय मिळू शकत हा क्षुद्र विचार आहे. तुम्ही काय देऊ शकता हा विचार तुम्हाला वरच्या पातळीवर नेऊन बसवतो. म्हणून नेहमी देत राहा. त्यामुळे तुमच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. आपण लोकांच्या नजरेत कसे आहोत या पेक्षा स्वतःच्या नजरेत कसे आहोत हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

स्वतःची काळजी घ्या: हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला नीटनेटक्या व्यक्तीवर प्रेम करावस वाटेल कि अजागळ? स्वतःची अतीशय काळजी घ्या. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत. तुमचं चालणं , बोलणं, दिसणं या गोष्टी तुमच्या असण्याचा भाग आहेत. तुम्ही जेव्हा प्रेझेंटेबल असता तेव्हा नकळतच तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि तुम्ही स्वतःच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडता.

स्वतःला पॅम्पर करा: 

How Micronutrients Help You Practice Self-Love

तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीचे जसे लाड कराल तसे स्वतःचे लाड करा. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकून, चित्र काढणं, सिरीज बघणं, लिखाण करण. त्या गोष्टीमुळे तुमचं मन ताजतवानं राहील आणि आयुष्य रटाळ होणार नाही. तुम्हाला तुमच्या आनंदाची निधानं स्वतः निर्माण करायची आहेत. स्वतःच्या आनंदच कारण स्वतः बनायचं आहे. मसाज घ्या.व्यायाम करा. फिरायला जा. मनसोक्त आईस्क्रीम खाताना कॅलरीजचा विचार कधीतरी बाजूला ठेवा. मॅनिक्युअर पेडिक्युअर करून घ्या. चांगले डिओ वापरा. माझी मैत्रीण याच आदर्श उदाहरण होती. एकदा ती माझ्या घरी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाला आली होती. सकाळी सकाळी आम्ही अभ्यासाला उठलो. बाईसाहेबांनी सकाळी चार वाजता उठल्या उठल्या काय करावं? आधी पर्समधून लिपबाम काढून लावला. आता हिला कोण बघणार होत. पण तिला स्वतःला पॅम्पर करायला खूप आवडायचं. तीच स्वतःवर खूप प्रेम होत. स्वतःवर प्रेम करायला तिच्याकडून मी शिकले. ती म्हणायची, “मधू, मैं मेरी केअर नही करुंगी तो कौन करेगा” आणि ते खरंच होत. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे.

हा प्रवास सोपा नसेल. मी सर्व मुद्दे संपूर्णपणे सांगितले आहेत असेही नाही. पण युट्युबवर या बाबतीत बरेच टेड टॉक्स आहेत. ते सुद्धा तुम्हाला या प्रवासात मदत करतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

4 thoughts on “स्वीकार स्वतःचा

Add yours

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Website Built with WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: