जेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही …

आपण बऱ्याच वेळा परिस्थितीवर अति विचार करून त्याला आहे त्यापेक्षा मोठ्या समस्येचं रूप देतो. बऱ्याच वेळा या जगात आपल्यापेक्षा अधिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारे आणि आणि त्यावर मात करून पुढे जाणारे लोक या जगात होऊन गेले, आहेत आणि होतील.

आपल्या प्रश्नांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघता आलं पाहिजे.

जेव्हा तुम्हाला तुमच्या समोर अडचणींचा डोंगर आहे असं वाटत असत तेव्हा नीट विचार करा आणि आपली मूळ समस्या शोधून काढा.

उदाहरणार्थ, समजा तुम्ही बेरोजगार आहेत ही समस्या आहे. मग तुमच्या मनात साधारणपणे पुढील विचार येतात. अरे बापरे. माझ्या मित्रमैत्रिणींकडे जॉब आहे. त्यांची लग्न झाली, त्यांनी गाड्या घेतल्या. अजून मी कुठेच नाही. आई ओरडतोय. जर माझ्याकडे जॉब असता तर कदाचित हे ऐकून घ्यावं लागलं नसत. वय वाढत चाललंय पण जॉब नाही. माझ्याकडे चांगला जॉब मिळवण्यासाठी कोणतंही स्किल नाही. माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. पैशांची गरज आहे, पण जॉब नाही. माझं एका मुलीवर प्रेम आहे पण तिला कसं विचारू? माझ्याकडे जॉब नसताना ती मुलगी मला हो कशी म्हणेल. माझे भाऊ बहीणही स्थिरस्थावर नाही आहेत. त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. पण मी त्यांना मदत करू शकत नाही. मला खूप असहाय वाटत आहे. हि अवस्था कधी संपणार! इत्यादी इत्यादी इत्यादी.

आता वरील सर्व विचार लक्षात घेतले तर एखाद्याला आपल्या आयुष्यात अडचणींचा डोंगर आहे असं वाटू शकत. पण जर नीट विचार केला तर एकच उत्तर सर्व समस्यांचं समाधान करू शकत. वरील उदाहरणामध्ये “जॉब” मिळणं हे ते उत्तर आहे.

एकदा समस्या कळली कि त्यावर उपाययोजना करणं शक्य होत.

एकदा समस्या कळली कि त्या समस्येचं निवारण करण्याचा प्लॅन बनवा. ती समस्या सोडवण्याच्या मार्गात कोणते अडथळे येऊ शकतात त्यांची यादी करा.

वरील उदाहरण लक्षात घेतलं, तर शिक्षण पूर्ण नसणे किंवा उपयोगी स्किल हाताशी नसणे, कामाचा पूर्वानुभव नसणे हे अडथळे असू शकतात. यावर उपाय काय असू शकतो?

अशा वेळी आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम हवं आहे त्याचा निर्णय घ्या. त्या साठी लागणारं कौशल्य आत्मसात करा. ज्या ज्या मार्गाने मदत मिळू शकेल ते ते सर्व मार्ग चोखाळा. कामाचा अनुभव नाही? कोणी इंटर्नशिप देतंय का बघा. ऑनलाईन इंटर्नशिप साठी अर्ज करा. interview साठी तयारी करा. interview चे प्रश्न शोधा. youtube चे vidoe पहा. क्लास लावा. थोडक्यात म्हणजे समस्येवर चारी बाजूने हल्ला चढवा. तुम्ही हळूहळू नक्कीच यशस्वी व्हाल.

आता हे करत असताना नक्कीच तुम्हाला कधी कधी खूप असहाय वाटू शकत. एकटेपणाची भावना येऊ शकते. स्वतःच्या चुका उगाळून स्वतः दोष द्यावासा वाटू शकतो. अशावेळी मित्रमैत्रिणींचा आधार घ्या. त्यांच्याकडे मन मोकळं करा. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालावा. चांगली पुस्तक वाचा. मेडिटेशन करा. सर्व निगेटिव्ह गोष्टींपासून आणि माणसांपासून लांब राहा. ती निगेटिव्हिटी जर जवळच्या माणसांकडून येत असेल तर काही काळापुरते कानाचे आणि मनाचे पडदे दगडाचे करून टाका. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तीच माणसं तुमचा उदो उदो करतील. त्या क्षणाचा विचार करून सध्यापुरत स्वतःला अलिप्त करून टाका. youtube वरचे motivational विडिओ पहा. आणि या परिस्थितीतून मी मार्ग काढणार हा आत्मविश्वास ठेवा. खरंतर, स्वतःला सांगा कि, जर या परिस्थितीतून यशस्वी होण्याची क्षमता या आख्ख्या जगात जर कोणाकडे आहे तर ती माझ्याकडेच आहे.

खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीरसे पहले खुदा बंदेसे खुद पूछे, बता ‘तेरी रजा क्या है.

म्हणजे माणसाने स्वतःला इतकं बळकट बनवावं कि त्याच नशीब लिहिण्या आधी देवाने स्वतः त्याला विचारावं कि बोल, या जन्मी तुला कोणतं संकट पाठवू?

लोक कितीतरी भयानक परिस्थितीत जगत आहेत. काही लोकांना दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत आहे. कोणी अपघातात हात गमावलाय, पाय गमावलाय, कोणाच्या मुलांनी उतार वयात आई वडिलांना टाकून दिलं आहे.

आपण आपल्या समस्यांचा बाऊ करताना आपल्याकडे नेमकं काय आहे त्याचा हिशोबच लावायला विसरतो.

थोडक्यात सांगायचं तर ;

१. समस्या ओळखा

२. त्यावर मात करायचा निर्धार करा.

३. समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या अडचणीची यादी करा आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी उपाय योजना करा.

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.