झाडाचं गाणं

खरं सांगते शपथ तुझी
पाहिलं झाडाला डुलताना
आज मी रानामधी ….
चिंब चिंब पावसात
झाड ते न्हात होतं
न जाणे कोणतंतरी
वेगळंच गाणं गात होत…
पाऊस असा वेड्यासारखा
मुसळधार बरसत होता
गाणाऱ्या झाडालाच
तो ताल जसा देत होता
पाऊस असंच कोणालाही
वाहत वाहत नेतो…
झाडं, माती, डोंगर, दऱ्या
कुशीत सगळं घेतो…
पाऊस असा बरसतो तेव्हा
जरा बहकता आलं पाहिजे
गाणाऱ्या झाडासारखं
मस्तीत झुलता आलं पाहिजे
-मधुराणी