अल्लडशी ही दुपार बोले
चल झेलू पावसाचे झेले
वाट नको तू आता पाहू
बाहेर जाऊन पाणी झेलू
नभास झाला पावसाचा भार
पाणी पडते अपरंपार
सुखात एकदा न्हाऊन घेऊ
बाहेर जाऊन पाणी झेलू
वाटे जग स्तब्ध सारे
कधीतरीच हे घडते ना रे?
आठवणी या कोरून ठेवू
बाहेर जाऊन पाणी झेलू
-मधुराणी