माझी आवडती अनुवादित पुस्तके.

शांताराम :

ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स यांचं थरारक पुस्तक. हजार पानी पुस्तक आहे. पण हातातून खाली ठेववत नाही. ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स हे भारतात येऊन राहिले होते. ते उत्तम मराठी बोलू शकतात. त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांचा संबंध मुंबईच्या अंडरवर्ल्ड सोबत आला त्याची हि कहाणी. (अजून एक सांगायचं म्हणजे रंग दे बसंती चित्रपटात एक गाणं आहे. “तू… बिन बतायें.. “त्यात एका सिन मध्ये आमिर खानच्या हातात हे पुस्तक आहे.अर्थात इंग्रजी मधील आवृत्ती ) हे पुस्तक मराठीत अपर्णा वेलणकर यांनी भाषांतरित केलं आहे. नक्की वाचा.

अग्निपंख :

या अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाबद्दल मी काय सांगणार. नक्की वाचा .

तोत्तोचान :

ही गोष्ट आहे जपानमधील एका लहान मुलीची. जिला चक्क पहिलीत असताना शाळेतून काढून टाकलं होत. जेव्हा तिला कळतही नव्हतं कि तिने असं काय चुकीचं केलं आहे ! तिच्या आई बाबानी मग तिला एका नवीन शाळेत घातलं. ती शाळा मात्र स्वप्नवत होती. त्या शाळेत वर्ग म्हणून चक्क ट्रेनचे डबे होते. शिस्तीचा बडगा न उगारता मुलांना शिस्त लागली होती. त्या मुलीची आणि त्या शाळेची अतिगोड आणि हृद्य गोष्ट.

एका कोळियाने :

हेमिंग वे च्या दि ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकाचं पु ल देशपांडे यांनी केलेले हे भाषांतर आहे. माणसाच्या विजिगीषेचं आणि जिद्दीचं दर्शन घडवणार पुस्तक.

माझी जीवन कहाणी :

हेलन केलर या एक अत्यंत वेगळं आयुष्य जगलेल्या बाईची माणसाच्या जिद्दीला सलाम कार्य लावणारी कहाणी. हेलन केलर हिला बोलता येण्याआधीच एका तापामध्ये अंधत्व आणि बधिरत्व आलं. जर व्यक्तीला ऐकू येत नसेल तर निदान हातवारे करून आणि समोरच्याच्या ओठांच्या हालचालींवरून बोलण शिकवलं जाऊ शकत. अंधत्व असेल तर निदान आवाज ऐकून व्यक्ती संभाषण साधू शकते. पण ऐकून आणि बोलणं दोन्ही नसेल तर? आयुष्य किती बिकट होईल? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जर हि गोष्ट कोणतीही भाषा शिकण्या आधीच झाली तर? त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय आशा शिल्लक उरेल? हि बाई त्या अपंगत्वाला पुरून उरली. ती बोलायला शिकली. एवढच नव्हे तर तिने आयुष्यात अनेक भाषण दिली. तिने शिक्षण पूर्ण केलं. तिच्यासारख्या लोकांसाठी मोठं कार्य उभं केलं. आणि हि प्रचंड मोठी यशोगाथा या छोट्याश्या पुस्तकात आहे. आवर्जून वाचा

माझी जीवन कहाणी: हेलन केलर | Mazi Jeevan Kahani : Helan Kelar

प्रेषित :

खलील जिब्रान या विचारवंताच आणि मनस्वी माणसाचं हे पुस्तक वाचण म्हणजे एक अलौकिक अनुभव आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलुंवरचे विचार यात मांडले आहेत. नक्की वाचा.

मुक्काम शेंडेनक्षत्र :

जूल्स व्हर्न यांच्या ऑफ ऑन द कॉमेट नावाच्या साय-फाय कादंबरीचे भा रा भागवत यांनी केलेले हे भाषांतर आहे. मी विवेचन दिले असते पण मला त्यातली मजा नाही घालावयाची. पण हे माझ्या अति आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे.

Mukkam Shendenakshatr (Marathi Edition) eBook: Bhagwat, B. R. : Amazon.in: Kindle Store

हॅनाची सुटकेस :

या गोष्टीची सुरुवात होते टोकियो (जपान)मधल्या एका लहानशा वस्तूसंग्रहालयात. तिथेच ही हॅनाची तपकिरी रंगाची सुटकेस काचेच्या कपाटात ठेवलेली आहे. तिथे ती सुटकेस पाहायला रोज खूप मुलं येतात. त्या सुटकेसवर लिहिलं होतं – हॅना ब्रॅडी. जन्म १६ मे १९३१. ‘वाइजनकिड म्हणजे अनाथ’. संग्रहालयात येणाऱ्या मुलांना प्रश्न पडायचे – कोण होती ही हॅना? ती कुठे राहायची? भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती? काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये? ती अनाथ कशी झाली? तिचं पुढे काय झालं? आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली?

हेच प्रश्न आपल्याही पडतात, पुस्तक वाचायला सुरुवात केल्याबरोबर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम हरतऱ्हेचे प्रयत्न करून केलं ते संग्रहालयाची समन्वयक फ्युमिको इशिओकानं. तिनं जगच पालथं घातलं हॅनाची कथा शोधण्यासाठी.

१९३९ ते १९४५ या दुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात हिटलर नावाच्या नाझी भस्मासुरानं ज्यू धर्मियांविषयीच्या प्रचंड द्वेषानं लाखों ज्यूंचा अनन्वित छळ केला, त्यांना गॅसचेंबरमध्ये कोंडून त्यांचा संहार केला. या ‘नरसंहाराला हॉलोकास्ट’ असं म्हणतात. अवघ्या तेरा वर्षांची हॅनाही या होलोकास्टमध्येच नाहीशी करण्यात आली. क्रूरपणानं तिला मरण्यासाठी २३ ऑक्टोबर १९४४ ला गॅसचेंबरमध्ये पाठवण्यात आलं. लाखो ज्यू मुलांना असंच संपवण्यात आलं. मरणापूर्वी ३ वर्ष हॅनानं छळछावण्यांमधला छळ सोसला. हिटलरच्या कुरतेनं हॅना तिचे आई, वडील, भाऊ या साऱ्यांशी ताटातूट केली. पोरकेपणाचं, एकटेपणाचं भयंकर यातनादायी दु:ख साऱ्यांनीच भोगलं.

हॅनाची सुटकेस

Hanas Suitcase by Madhuri Purandare – Book Buy online at Akshardhara

One thought on “माझी आवडती अनुवादित पुस्तके.

Add yours

Leave a Reply to माझी आवडती अनुवादित पुस्तके. — गावगोष्टी | Mon site officiel / My official website Cancel reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Website Built with WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: