शपथ तुला!

तुझ्या भेटीची रे सख्या जीवा लागे ओढ
नको करू आता उशीर शपथ तुला!
साद ओळखीची माझी ऐकना रे आता;
वेडा आतुरला जीव भेट ना रे मला…
तुझ्या रंगात मी ऐसी गेले रंगून,
रूप ओळखेना माझे दर्पणी बघून.
ऐसा हट्ट नव्हे बरा जिवा लागे घोर,
तुझ्या मिठीत यायला आतुरले मन.
रागावून जाईन मी निघूनच दूर…
तुज सावरण्या मग राहील रे कोण?
माझ्या जीवन गाण्याचा तूच आहे नाद;
लय बिघडण्या आधी दे शेवटची साद…