हे धडधडणारे उर ,
लागली जीवाला ओढ …
ही नको नकोशी आशा
तू पाण्यावरती सोड !
ते कधीच होणे नाही
जे घडावयाचे नव्हते …
मन पाऊस वेडे माझे
उन्हात भटकत फिरले .
तू कृष्ण सखा विरागी
मन राधा राधा झाले …
कृष्ण नसे राधेचा हे
सत्य मी विसरून गेले …
तू नाहीच धरशील हात
मी दूर दूर जाताना …
तुज कळतील का रे अश्रू
मम गीतातून झरताना ?
दूरस्थ आकाशातील
चांदणी मी बनून जाईन!
पुरविण्यास तुझिया इच्छा;
मी क्षणात निखळून येईन !
– मधुराणी