मी क्षणात निखळून येईन!

हे धडधडणारे उर ,
लागली जीवाला ओढ …
ही नको नकोशी आशा
तू पाण्यावरती सोड !

ते कधीच होणे नाही
जे घडावयाचे नव्हते …
मन पाऊस वेडे माझे
उन्हात भटकत फिरले .

तू कृष्ण सखा विरागी
मन राधा राधा झाले …
कृष्ण नसे राधेचा हे
सत्य मी विसरून गेले …

तू नाहीच धरशील हात
मी दूर दूर जाताना …
तुज कळतील का रे अश्रू
मम गीतातून झरताना ?

दूरस्थ आकाशातील
चांदणी मी बनून जाईन!
पुरविण्यास तुझिया इच्छा;
मी क्षणात निखळून येईन !

– मधुराणी

5 thoughts on “मी क्षणात निखळून येईन!

Add yours

    1. हो. या वेबसाईटवरील सर्व पोस्ट माझ्या स्वतःच्या आहेत. कॉम्प्लिमेंटसाठी थँक्स 🙂

      Like

  1. This is Epic ! But also have great reverence for the ” Sahir “, who was able to extract such a magnificent creation from this beautiful mind.

    Like

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Website Built with WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: