कधी अवचित यावे जादुमयसे घडून
सांज वेळेला लागावी निळीजांभळी चाहूल
नभ दाटुनिया यावे जशी वेडी आठवण
मन एककल्ली व्हावे साऱ्या पसाऱ्यामधून
सारा अंधारच व्हावा मऊसूत पांघरूण
सरी पावसाच्या गाती मधू वेल्हाळशी धून
नशा एकलेपणाची क्षणाक्षणाला चढावी
सोबतीची सारी आस थेंबाथेंबाने भागावी
– मधुराणी

अहाहा…मस्तच…फार छान
LikeLike
अंधारच माऊसूत पांघरुण.. थेंबांच मंद्र सप्तक.. ओघळत जाणाऱ्या आठवणी.. क्या बात है.. मस्त.
LikeLiked by 1 person
Thank you 🙂
LikeLike