कधीतरी कुठेतरी प्रत्येकाचा जीव जडला असणार. जीव जडून हुरहुरून प्रत्येकजण कधीतरी आपल्याच तंद्रीत नक्की फिरला असणार. पण सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशा थोड्याच होतात? आणि मग गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीत तेव्हा त्यातून सवयच कसं? या वढाय वढाय मनाला आवरायचं कसं?
