मी तिसरीत होते आणि माझा भाऊराया पहिलीत होता. तो खूप हट्टी आणि आडदांड होता. त्याने बाबांकडे सायकलीसाठी हट्ट केला. शेवटी बाबानी त्याला लहान मुलांसाठी असते तशी सायकल आणून दिली आणि त्याला सांगितलं, कि ताईलासुद्धा सायकल चालवायला द्यायची.
शस्त्रक्रिया
डॉक्टर येऊन मला विचारायचे, "कशी आहेस?" "एकदम झकास"- इति मी! (सवयीने. अर्थातच!) "एवढी झकास आहेस तर हॉस्पिटलमध्ये काय करतेयस. घरी जा ना."- इति डॉक्टर.
Not-So-Happy Birthday
मी माझ्या वाढदिवसाला खूप लोकांसोबत होते पण खूप एकटी होते.
एक अतिगोड गोष्ट
सकाळी मी घाई घाईने ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होते. आईने मला डबा दिला आणि म्हणाली, "बाबानी तुला फोन करायला सांगितलं आहे." बाबा आधीच ऑफिसला निघून गेले होते. मी विचारात पडले. बाबांचं काय काम असेल माझ्याकडे?