अंधारातही सावल्या
कशा येति अंगावर
त्यांना ठाउकही नाही
माझी मेलेली नजर

काही गंध नेतात मला पाऊस भरल्या रानात …
पाऊस असा वेड्यासारखा
मुसळधार बरसत होता
गाणाऱ्या झाडालाच
तो ताल जसा देत होता …
अल्लडशी ही दुपार बोले
चल झेलू पावसाचे झेले
पावसाच्या धारा हातांवर झेलत तू खिडकीत उभी राहतेस
आणि आजूबाजूचं जग विसरून खोल खोल आत बुडत जातेस..
तुझं आणि पाण्याचं असं नातं
माझ्या आणि तुझ्या नात्याहूनही अधिक प्रवाही
अधिक गहिरं…
का बरं ?
गरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !” हो! तेच असावे हे! कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.
फक्त तू होतास खरा…
अन ती रात्र होती खरी;
बोटांनी पाठीवर लिहिलेली…
तुझी गाणी होती खरी!