गरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !” हो! तेच असावे हे! कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.

गरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !” हो! तेच असावे हे! कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.
फक्त तू होतास खरा…
अन ती रात्र होती खरी;
बोटांनी पाठीवर लिहिलेली…
तुझी गाणी होती खरी!
वाटेत येऊन तू जरा हात धरलास…
अन तुझ्या कुशीत मी कोसळले होते…
तुझ्या शब्दांना मी खरे मानले होते…
का बर पुन्हा मी तशीच चुकले होते…
पडद्यातून झिरपणारे ऊन
माझ्या अंगाला बिलगावे
त्या किरणांचा मत्सर वाटून
तू मला जवळी घ्यावे…
साजिरे गोजिरे रानफूल…
त्याची पडे रानाला भूल….
एक अशी स्त्री जिच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे, जिच्या चेहऱ्यावर समाधानाचं आणि आत्मविश्वासाचं (अहंकाराच नव्हे हं) हसू आहे, विचार आणि कृतीत एकतानता आहे, जिचं जीवनावर मनस्वी प्रेम आहे अशी स्त्री
उंदीर हे एक रूपक आहे. जगण्याची धडपड करता करता रंजलेले गांजलेले लोक. शहरातील मजूरवर्ग. झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीचा लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक. ज्यांच्या ना जन्माचा हिशोब आहे ना मरणाची दाद आहे. ज्यांना आयुष्यातील चांगली हवा, शुद्ध पाणी, पोटभर जेवण, शिक्षण अशा मूलभूत गरजाही नाकारल्या गेल्या आहेत. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाचा काही पुरावा नाही. या राष्ट्राचे नागरिक असूनही ज्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही,अशा लोकांची फिर्याद कवी मांडतो आहे.
एका कळीचा फुल होण्याचा प्रवास बालकवींनी कवितेत अजरामर करून ठेवलाय.
तिला मिळालेल्या या एका रात्रीमध्ये तिला आयुष्यभराचा आनंद मिळाला. कारण ही परमात्म्याची रात्र फक्त तिच्यासाठी होती. फक्त तिच्यासाठी होती.
You must be logged in to post a comment.