चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.

चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.
कुणा न माहित सजा किती तेकोठून आलो ते नच कळतेसुटकेलाही मन घाबरतेजो आला तो रमलाजग हे बंदिशालागदिमांच्या या अजरामर ओळी ! भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडेल किंवा घडणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही. पण […]
जगण्याची भ्रांत असलेल्या माणसाला ‘न्याय’ सुद्धा परवडावा लागतो. कधीकधी जगण्याची भ्रांत संपलेली असते पण आयुष्याची बसलेली घडी विसकण्याची हिम्मत कोण करणार? म्हणूनच हा वर्ग कधी मोर्चा नेत नाही. कधी संपही करत नाही. आपल्या छोटेखानी आयुष्याला सावरत कोणाच्या अध्यात ना मध्यात असा वावरत असतो. क्रांतीचा जन्म अशा वर्गात सहसा होत नाही. क्रांती तिथे जन्मते जिथे काही गमावण्याची भीतीच मेलेली असते.
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे..
एक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना? कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं …
कोण होती ही हॅना? ती कुठे राहायची? भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती? काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये? ती अनाथ कशी झाली? तिचं पुढे काय झालं? आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली?
ज्या देशात तत्वज्ञान सुद्धा “गीतेचं” रूप घेऊन येतं तिथे हा प्रश्न कोणाला पडू नये खरं तर.
स्वतःला सांगा कि, जर या परिस्थितीतून यशस्वी होण्याची क्षमता या आख्ख्या जगात जर कोणाकडे आहे तर ती माझ्याकडेच आहे.
गरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !” हो! तेच असावे हे! कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.
स्वतःला नाकारण्यापासून स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो. खरतर तो सर्वात सोपा असायला हवा. स्वतःपासून स्वतःपर्यंतच अंतर एवढं मोठं कधी झालं? आपण अशा समाजात राहतो जिथे सतत आपल्याला दुसऱ्यांना काहीतरी सिद्ध करायचं असते. चारीबाजूने निगेटिव्ह विचारांचा मारा होत असतो. तुमच्यात काहीतरी कमी आहे हे सतत जाणवून दिल जात. आपल्याला वाटत कि प्रेम हे बक्षीस आहे.
वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानण्यात आला. नामस्मरणाचे महत्व सांगून बुवाबाजीला आळा घालण्यात आला. आणि या कार्याची सुरवात ज्ञानेश्वरांपासून झाली.