मला जिंकायचं असेल ना, तर तुला स्वतःला विसरावं लागेल. थोडंसं तुझं मी पण माझ्यात मिसळावं लागेल, तेव्हाच तर होईन मी तुझा; तुझ्यामध्ये मीही स्वतःला विसरून जाईन. तुझ्या रंगात रंगून जाईन. आणि मला कळणारच नाही कि मी कधी तुझा झालो. मी कधी तुझ्यासाठी फुललो…

आपण एकटे असतो तेव्हा एकटेच असतो. पण आपण जर कोणासोबत असूनही एकटे पडलो असू तर त्यापरत दुःख नाही.
त्या शिवसुंदर करूणाकाराची कृपा असेल तर आयुष्याचा प्रवास करायचा धीर शतपटीने वाढेल. त्या विश्वविधात्याच्या मार्गदर्शनाखाली हा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि रम्य होईल
कधीतरी कुठेतरी प्रत्येकाचा जीव जडला असणार. जीव जडून हुरहुरून प्रत्येकजण कधीतरी आपल्याच तंद्रीत नक्की फिरला असणार. पण सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशा थोड्याच होतात? आणि मग गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीत तेव्हा त्यातून सवयच कसं? या वढाय वढाय मनाला आवरायचं कसं?
मुंबई मधल्या चाळीतील एक लहानसं घर. आजी ,आई, बाबा, ताई आणि एक छोटा भाऊ असं छोट कुटुंब. यात काही फारसं विशेष नाही. पण हा काळ आहे साधारण १९९९-२००० सालंचा. जवळपास सगळ्यांच्या घरी रंगीत टीव्ही आलेले […]