उंदीर हे एक रूपक आहे. जगण्याची धडपड करता करता रंजलेले गांजलेले लोक. शहरातील मजूरवर्ग. झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीचा लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक. ज्यांच्या ना जन्माचा हिशोब आहे ना मरणाची दाद आहे. ज्यांना आयुष्यातील चांगली हवा, शुद्ध पाणी, पोटभर जेवण, शिक्षण अशा मूलभूत गरजाही नाकारल्या गेल्या आहेत. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाचा काही पुरावा नाही. या राष्ट्राचे नागरिक असूनही ज्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही,अशा लोकांची फिर्याद कवी मांडतो आहे.

You must be logged in to post a comment.