मी तिसरीत होते आणि माझा भाऊराया पहिलीत होता. तो खूप हट्टी आणि आडदांड होता. त्याने बाबांकडे सायकलीसाठी हट्ट केला. शेवटी बाबानी त्याला लहान मुलांसाठी असते तशी सायकल आणून दिली आणि त्याला सांगितलं, कि ताईलासुद्धा सायकल चालवायला द्यायची.

डॉक्टर येऊन मला विचारायचे, “कशी आहेस?” “एकदम झकास”- इति मी! (सवयीने. अर्थातच!) “एवढी झकास आहेस तर हॉस्पिटलमध्ये काय करतेयस. घरी जा ना.”- इति डॉक्टर.
स्वतःला नाकारण्यापासून स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो. खरतर तो सर्वात सोपा असायला हवा. स्वतःपासून स्वतःपर्यंतच अंतर एवढं मोठं कधी झालं? आपण अशा समाजात राहतो जिथे सतत आपल्याला दुसऱ्यांना काहीतरी सिद्ध करायचं असते. चारीबाजूने निगेटिव्ह विचारांचा मारा होत असतो. तुमच्यात काहीतरी कमी आहे हे सतत जाणवून दिल जात. आपल्याला वाटत कि प्रेम हे बक्षीस आहे.
वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानण्यात आला. नामस्मरणाचे महत्व सांगून बुवाबाजीला आळा घालण्यात आला. आणि या कार्याची सुरवात ज्ञानेश्वरांपासून झाली.
पुलंनी एका ठिकाणी म्हटलं होत, “मला पाहायला आवडतात माणसे, असंख्य स्वभावाची असंख्य नमुन्याची, माणसासारखं पाहण्यासारखं या जगात काहीच नाही
मी खूप उधळते. ..
आणि तू काहीच बोलत नाहीस…
पण तू असतोस. .. साथ द्यायला. .
पडले तर हात द्यायला…
फक्त तू होतास खरा…
अन ती रात्र होती खरी;
बोटांनी पाठीवर लिहिलेली…
तुझी गाणी होती खरी!