हे धडधडणारे उर ,
लागली जीवाला ओढ …
ही नको नकोशी आशा
तू पाण्यावरती सोड !

हे धडधडणारे उर ,
लागली जीवाला ओढ …
ही नको नकोशी आशा
तू पाण्यावरती सोड !
चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.
जगण्याची भ्रांत असलेल्या माणसाला ‘न्याय’ सुद्धा परवडावा लागतो. कधीकधी जगण्याची भ्रांत संपलेली असते पण आयुष्याची बसलेली घडी विसकण्याची हिम्मत कोण करणार? म्हणूनच हा वर्ग कधी मोर्चा नेत नाही. कधी संपही करत नाही. आपल्या छोटेखानी आयुष्याला सावरत कोणाच्या अध्यात ना मध्यात असा वावरत असतो. क्रांतीचा जन्म अशा वर्गात सहसा होत नाही. क्रांती तिथे जन्मते जिथे काही गमावण्याची भीतीच मेलेली असते.
तिच्याच सोबत बांधावीस तू मनामधली घरं…
नशिबापुढे झुकावं लागत एवढं मात्र खरं!
आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याला समजून घ्यावं, पण खरंतर आपणच स्वतःला किती ओळखतो? एखाद्या क्षणी आपली एखाद्या गोष्टीवर नक्की प्रतिक्रिया काय असेल ते १००% अचूकतेने आपण आधी नाही सांगू शकत. मग दुसऱ्यांकडून अशी अपेक्षा कशी बरं ठेवता येईल.
मला जिंकायचं असेल ना, तर तुला स्वतःला विसरावं लागेल. थोडंसं तुझं मी पण माझ्यात मिसळावं लागेल, तेव्हाच तर होईन मी तुझा; तुझ्यामध्ये मीही स्वतःला विसरून जाईन. तुझ्या रंगात रंगून जाईन. आणि मला कळणारच नाही कि मी कधी तुझा झालो. मी कधी तुझ्यासाठी फुललो…
आपण एकटे असतो तेव्हा एकटेच असतो. पण आपण जर कोणासोबत असूनही एकटे पडलो असू तर त्यापरत दुःख नाही.
त्या शिवसुंदर करूणाकाराची कृपा असेल तर आयुष्याचा प्रवास करायचा धीर शतपटीने वाढेल. त्या विश्वविधात्याच्या मार्गदर्शनाखाली हा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि रम्य होईल